चोपडा तालुक्यातील विटनेर येथील तलाठी  ५ हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात…

चोपडा तालुक्यातील विटनेर येथील तलाठी  ५ हजाराची लाच घेताना एसीबीच्या  जाळ्यात.

चोपडा तालुक्यातील विटनेर येथील तलाठी
रविंद्र काशिनाथ पाटील वय ५० याने
तक्रारदार यास १० हजार रुपयाची मागणी
केली त्यापैकी ५ हजार रुपये घेताना
जळगाव येथील लाच लुचपत विभाग
पथकाने आज मंगळवार दि.२८ रोजी
रंगेहात पकडले.


याबाबत सविस्तर माहिती अशी की
यातील तक्रारदार यांचे सासऱ्याचे नावाने
पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकूल
मंजुर झालेले होते. घरकूल बांधण्यासाठी
रेतीची आवश्यकता असल्याने तलाठी
आर. के. पाटील यांनी तक्रारदार यांचे कडे
वाळू ट्रक्टरचे वाहतूकीसाठी 10000/-
रुपये लाचेची मागणी केली होती.


त्याबाबत तक्रारदार यांनी काल दि. २७ मे २०२४ रोजी लाच लुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली.सदर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पंचा समक्ष आज मंगळवार दि.२८ रोजी पडताळणी केली असता तलाठीआर. के. पाटील यांनी पंचा समक्ष ५ हजार रुपयाची लाचेची मागणी केली आणि तक्रारदार कडून ५ हजार रुपयाची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.त्यांचेवर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More