सराईत दरोडाखोरांच्या 5 जणांचा टोळीतील 2 जणांना पकडण्यात चोपडा शहर पोलिसांना यश # 3 आरोपी फरार…
दि. २८रोजी चोपडा शहरातील श्रीकृष्ण कॉलनी भागातील श्री नवल ओंकार पाटील यांचे राहते घरी रात्रं ०२:०० वा.चे सुमारास ते व त्यांची पत्नी झोपले असतांना अनोळखी ५ पुरुष चोरट्यांनी त्यांचे घराचे कंपाऊंडचे कुलूप व दरवाज्याचे कर्ड कोंडा तोहुन आत प्रवेश करुन कोयत्याचा चाक दाखवुन चापटांनी मारुन तुम्ही आवाज केला तर तुम्हाला मारुन टाकु अशी धमकी देवुन शिवीगाळ करुन फिर्यादीचे घरातील कपाटात ठेवलेले रोख ९,५००/- रुपये तसेच स्टेट बँकेचे पासबुक तसेच आधारकार्ड असे त्यांचे समक्ष जबरदस्तीने कावुन चोरी करुन त्यांचे कडील पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी क्रमांक ८५५८ हिचेने पळून गेले होते. अश्या फिर्यादीवरुन चोपडा शहर पोस्टे भा.दं. वि. कलम ३९५, ३२३,२९४,५०६ सह आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

सदर बावत चोपडा शहर पोलीस स्टेशनचे तपास पथकास माहीती मिळाली असता. पोलीस निरक्षक मधुकर साळर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना पोलीस निरीक्षक साळवे यांनी सोबत घेवुन तात्काळ परीसरात शोध घेतला असता चोपडा शहर ते धरणगाव रोडला पाटाचे कडेला सदर गुन्हयातील वाहन ब्रिझा कंपनीची पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी क्रमांक MH ०६ BU ८५५८ हि मिळुन आली. पोलीसांची चाहुल लागल्याने सदर वाहनातील ५ आरोपी हे पळून जात असतांना आरोपं क्रमांक १) कौसर मुसा खाटीक वय २७ वर्ष रा. राणीपुरा होळी चौक दोडांईचा ता.शिंदखेडा जि. धुळे २) देवेंद्र युवराज काकडे वय ३० वर रा.गोपालपुरा दोडांईचा ता.शिंदखेडा जि. धुळे यांना पोलीस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून त्यांच् साथीदार ३) सुलतान खालीक पिंजारी रा. इस्लामपुरा दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे (फरार) ४) राजा कुरेशी पूर्ण नाव माहीत नाही. रा गौफनगर दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे (फरार) व एक अनोळखी इसम असल्याचे निष्पन्न केले. नमुद आरोपींचे कब्जात एक ब्रिझ कंपनीची वाहन क्रमांक MH ०६ BLU ८५५८ मिळून आले असुन सदर वाहनात एक लोखंडी कटर व वेगवेगळया नंबर असलेल्या ३ नंबर प्लेट मिळुन आल्या आहेत, तसेच आरोपी क्रमांक १) कौसर मुसा खाटीक वय २७ वर्ष रा.राणीपुरा होळी चौक दोडांईचा ता. शिंदखेड जि.धुळे याचे कडे गुन्हयात चोरी केलेली रोख रक्कम १५००/- र, एक कोयता व मोबाईल व आरोपी क्रमांक २) देवेंद्र युवराज काकडे वर ३० वर्ष रा. गोपालपुरा दोहांईचा ता.शिंदखेडा जि. धुळे याचे कडे गुन्हयात चोरी केलेली रोख रक्कम २०००/- रु, एक कोयता व मोवाईल मिळून आला. असा एकुण एकुण ७,२३,५००/-रुपये किमतीचा मुददेमाल आरोपींकडुन हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणल आहे.

सदर गुन्हयात अटक केलेले आरोपी क्र १) कौसर मुसा खाटीक वय २७ वर्ष रा.राणीपुरा होळी चौक दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर गुन्हे दाखल आहेत.आरोपी क्रमांक ०२ देवेंद्र युवराज काकडे याचेवर खालील प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

२९/२०१८ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे आरोपी क्र १) फौसर मुसा खाटीक वय २७ वर्ष रा. राणीपुरा होळी चौक दोडांईचा ता. शिंदखेडा जि. धुळे २) देवेंद्र युवराज काकडे वय ३० वर्ष रा.गोपालपुरा दोडांईचा ता. शिंदखेडा जि. धुळे यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्यांना मा. न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. डॉ. महेश्वर रेडडी, पोलीस अधिक्षक जळगाव, कविता नेरकर, अप्पर पोलीस अधिक्षक मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहा, पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, पोउपनि जितेंद्र वल्टे, सहा. पो. फौजदार जितेंद्र सोनवणे, पोहेकों संतोष पारधी, शेषराव तोरे, ज्ञानेश्वर जवागे, जितेंद्र चव्हाण, पोलिस नाईक-प्रशांत वाडीले पोलीस कॉन्टेबल- सुमेर बाघेरे, रविंद्र बोरसे, प्रकाश मथुरे महेद्र साळुंखे, हेमंत कोळी, प्रमोद पवार, समा तडवी अश्यांनी केली आहे.












