जागेचा किरकोळ वादातून मारहाण 3 जणांविरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

जागेचा किरकोळ वादातून मारहाण 3 जणांविरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

चोपडा येथील धनगर वाड्यात जागेचा वादातून मारहाण झाल्या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात घनशाम अरुण धनगर, ओम अरुण धनगर, कविता अरुण धनगर, तिन्ही रा धनगरवाडा चोपडा ह्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले.

फिर्यादी सुधाकर भगवान धनगर वय ३८ वर्ष धंदा. शेती रा चोपडा धनगरवाडा,यांनी दिलेल्या फिर्यादी वरून फिर्यादीचे पडीत जागेचे कुंपणास वरील आरोपींनी कुलुप लावले त्या कुलुपावर फिर्यादी यांनी त्यांचे कुलूप लावले ह्या किरकोळ कारणावरून दि.२८ रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास फिर्यादीचा राहत्या घरी जाऊन तिन्ही आरोपींनी एकजुटीने फिर्यादीस मारहाण करण्याच्या पुर्व तयारीनीशी  फिर्यादीच्या घरात प्रवेश करुन आरोपी घनशाम अरुण धनगर, याने त्याचे हातातोल चाकु सारखे वस्तुने फिर्यादीच्या डोक्यावर मारुन तसेच ओम याने त्याच्या हातातील चाकु सारखे काहीतरी वस्तुने फिर्यादीच्या डोक्यावर मारुन तसेच ओम याने फिर्यादीच्या तोंडावर, दाढीवर त्याचे हातातील फायटरने मारुन दुखापत करुन वरील जबड्याचा दात पाडुन आरोपी कविता हिने फिर्यादीच्या आईस चापटाबुक्यांनी मारहाण करुन तिन्ही आरोपीनी फिर्यादी सुधाकर भगवान धनगर यांना शिवीगाळ करुन धमकी दिली म्हणून भादवी कलम ३२६,४५२, ३२३,५०४, ५०६,३४, प्रमाणे,गुन्हा दाखल करण्यात आला आहे  चोपडा पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांचा मार्गदर्शनात उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More