चोपडा तालुक्यातील सत्रासेन  येथे बनावट, अवैध व विनापरवाना बनावट देशी संकरीत कापुस बियाणे पाकीटे जप्त.# निर्मल सीड्स फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार…

चोपडा तालुक्यातील सत्रासेन  येथे बनावट, अवैध व विनापरवाना बनावट देशी संकरीत कापुस बियाणे पाकीटे जप्त.# निर्मल सीड्स फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहे…

आज दि.०७. रोजी मे.निर्मल सिडस प्रा.लि.या बियाणे उत्पादक कंपनीचे नाव वापरून अंबिका हा देशी संकरीत कापुस बियाणे वाण बनावट तयार करुन तो चोपडा परीसरात विक्री होत असल्याची माहिती नाशिक विभाग व जळगाव जिल्हा गुण नियंत्रण भरारी पथकास मिळाली होती.

मे.निर्मल सिडस प्रा.लि.च्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत भरारी पथकाने सत्रासेन ता.चोपडा येथे बनावट ग्राहक तयार करुन बलवाडी ता.वरला जि.बडवानी येथील कोठारी कृषी केंद्राकडे देशी संकरीत कापुस बियाणे वाणाची मागणी केली.कोठारी कृषी केंद्राच्या प्रतिनिधीला डिलिव्हरी देताना भरारी पथकाने पकडले.
मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक,
कुरबान तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव मा.सुरज जगताप कृषी विकास अधिकारी जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली
मध्यप्रदेशातून लगतच्या तालुक्यांमध्ये  कापूस बियाण्याची तस्करी रोखण्यासाठी महत्त्वाकांक्षी कारवाई कृषी विभागाने केली आहे.

संशयित संजय कोठारी व इसाक खरते यांच्या विरोधात बियाणे कायदा १९६६,बियाणे नियम १९६७ व बियाणे नियंत्रण आदेश १९८३ अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ व भादवि१८६० मधील कलम ४२०,३४ अन्वये चोपडा पोलीस स्टेशन येथे श्री.विकास बोरसे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ,जळगाव यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवीला.

या कारवाईसाठी नितेंद्र पान पाटील, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग, विजय पवार मोहीम अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, दिपक साळुंखे ,तालुका कृषी अधिकारी ,चोपडा
किरण पाटील,कृषी अधिकारी पंचायत समिती व निर्मल सीड्स पाचोरा यांच्या प्रतिनिधींनी  परिश्रम घेतले.

निर्मल सीड्स प्रा.लि. पाचोरा ही बियाणे उत्पादक कंपनी संबंधितावर वारला जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश येथे गेल्या दोन वर्षापासून उत्पादन बंद असलेल्या निर्मल सीड्स उत्पादित देशी संकरित वाणाची बनावट निर्मिती करून ती शेतकऱ्यांना विकल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती निर्मल सिड्सचे   रिजनल मेनेजेर विवेक पाटील यांनी दिली

नाशिक विभागात पुरेसे कापूस बियाणे पाकिटे उपलब्ध झालेली असल्याने शेतकऱ्यांनी बनावट, अवैध व विनापरवाना कापूस बियाणे खरेदी करू नये.
कापुस बियाणे तसेच इतर कृषी निविष्ठा खरेदी करताना परवानाधारक निविष्ठाविक्रेत्यांकडूनच खरेदी करावी तसेच खरेदी करताना पक्क्या बिलाची मागणी करावी असे आवाहन मा विकास पाटील, संचालक , गुण नियंत्रण,महाराष्ट्र राज्य व मा.मोहन वाघ विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More