पाणी पुरी मुळे विषबाधा झालेल्या रुग्णांची चोपडाच्या आमदार लताताई सोनवणे यांनी घेतली भेट #आरोग्य विभागाला दिल्या सूचना…

पाणी पुरी मुळे विषबाधा झालेल्या रुग्णांची चोपडाच्या आमदार लताताई सोनवणे यांनी घेतली भेट #आरोग्य विभागाला दिल्या सूचना

अडावद ता चोपडा येथुन जवळच असलेले मौजे  कमळगाव येथे नेहमी प्रमाणे आठवडे बाजार भरला असतांना या आठवडे बाजारात पाणी पुरी वाला विक्रीस आला असता त्यांच्या पाणी पुरी तुन चांदसणी कमळगाव पिंप्री मितावली सह परिसरातील शेकडो नांगरिकांना विषबाधा झाला या कारणाने परिसरातील नागरिकाच्या मनात भितिचे वातावरण आहे

या रुग्णांना भेटण्यासाठी चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार  लताताई चंद्रकांतजी सोनवणे यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपुस केली व संबंधित डॉक्टर यांना रुग्णांची काळजी घ्या अशा सुचना दिल्या या प्रसंगी तालुका महिला आघाडी प्रमुख मंगलाताई पाटील कृ.उ.बा.सभापती नरेंद्र पाटील, संचालक शिवराज पाटील , माजी उपानगराध्यक्ष विकास पाटील, दिपक चौधरी,गोरख बाविस्कर, मंगल इंगळे,दिव्यांक सावंत,नंदु गवळी, दिपक पटाईत अंबादास कोळी ,वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदिप लासुकर , डॉ.पवन पाटील, डॉ.सागर पाटिल , डॉ.प्रसाद पाटिल, डॉ .अजय जोगदंड , डॉ ‌तृप्ती पाटील, डॉ.निलिमा देशमुख व शिवसैनिकांनी चोपडा सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन रूग्णाची विचारपूस केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More