चाकुचा धाक दाखवुन मोबाईल जबरी चोरी करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडून अटक.

चाकुचा धाक दाखवुन मोबाईल जबरी चोरी करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडून अटक.


सदर गुन्ह्याचे तपासात पोकों ईश्वर पाटील यांनी तांत्रिक विष्लेशण करून अनिल काशिनाथ सोनवणे रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव ह.मु. सावखेडा ता. जळगाव यांचे नाव निष्पन्न केले. त्यावर बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी सपोनि विशाल पाटील, पोह संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगावान पाटील, ईश्वर पाटील, मोतीलाल चौधरी सर्व नेम. स्थागुशा जळगाव अशांचे पथक तयार करून तात्काळ अनिल काशिनाथ सोनवणे, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव ह.मु.सावखेडा ता. जळगाव यांचा शोध घेवून त्यास अटक करून पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यावर नमुद पथक हे सावखेडा ता. जळगाव येथे जावून तिथे सदर आरोपीचा शोध घेतला असता तो सावखेडा गावातील भिलाटी येथील त्याचे राहते घरी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव रमेश उर्फ अनिल काशिनाथ सोनवणे, वय ३५, रा. भोलेनाथ किरणा दुकानाजवळ तडवी गल्ली हरिविठ्ठल नगर जळगाव ह.मु. सावखेडा भिलवस्ती ता. जळगाव असे सांगीतले. त्यावेळी त्यास सदर घटनेबाबत विचारपुस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला त्यावर त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ नमुद गुन्ह्यातील गेलामाल मोबाईल मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून पुढील कारवाई करीता धरणगाव पो.स्टे. गुरनं ४४०/२०२३ भादवि कलम ३९२ या गुन्ह्याचे पुढील तपासकामी धरणगाव पो.स्टे.ला जमा करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची कारवाई महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More