चोपडा शहरात अवैध वृक्ष तोड सुरूच… माजी नगराध्यक्षच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी केली वृक्ष तोड?… डेरेदार वृक्षांची कत्तल… प्रशासनाचे दुर्लक्ष…
चोपडा प्रतिनिधी :-
प्रशासन एकी कडे पर्यावरणाचा समतोल राखण्या करता झाडे लावा – झाडे जगवा सारखे प्रकल्प राबवत असताना चोपडा शहरात मात्र दि १७ जुलै रोजी अवैध वृक्ष तोड केल्याचे दिसून आले .चोपडा शहरांतील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित मुलांच्या वस्तीगृह लगतचे १५ ते २० डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. कापलेले झाडाचे लाकूड हे वसतिगृहातील मुलांचे जेवण बनवण्यासाठी वापरले जाणार असल्याचे आचारी लक्ष्मण आरी यांनी सांगितले.

या विषयी वन विभागाला विचारणा केली असता , शहरी भागातील विषय हा नगरपालिकेचा असल्यामुळे वन विभाग ह्या विषयी कार्यवाही करू शकत नाही .ह्या विषयी नगरपालिकेला विचारणा केली असता नगपलिकेने कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले .ह्या विषयी महावितरण अधिकाऱ्यांचा सांगण्यावरून झाडे कापली असल्याचे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अकाउंटंट साळुंखे यांनी सांगितले. कोणत्या अधिकाऱ्यांचा सांगण्यावर झाडे कापली अशी विचारणा केली असता काहीही न बोलता निघून गेले.

ह्या विषयी महावितरण अभियंता सुलक्षणे यांना विचारणा केली असता , महावितरण कोणतेही झाड हे मुळा सकट कापत नसल्याचे सांगितले .कुठे अडथळा निर्माण होत असल्यास फक्त फांद्या छाटत असतात.
महात्मा गांधी शिक्षण मंडळला आमचा कडून झाडे कापण्या संदर्भात सांगितले गेले नसल्याचे महावितरण अभियंत्यांनी महाराष्ट्र 9 शी बोलताना सांगितले .पंचनामा करून कारवाई करणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे आत्माराम बाविस्कर यांनी माहिती पत्रकारांना दिली . पंचनामा बाबतीत विचारणा केली असता दि.२२ जुलै रोजी महात्मा गांधी शिक्षण मंडळ यांचा वतीने झाडे कापल्या नंतर झाडे कापण्यासाठी परवानगी साठी अर्ज आलेला असल्याची माहिती दिली. नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे आत्माराम बाविस्कर यांनी सांगितले की,या विषयी अधिक माहिती साठी मुख्याधिकारी यांना भेटावे मात्र मुख्याधिकारी यांचाकडे यावल पालिकेचा पण अतिरिक्त पदभार असल्यामुळे मुख्याधिकारी यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता , कुठलाही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

महावितरणने सांगितले म्हणून झाडे कापले गेले असल्याचे माजी नगराध्यक्ष तथा महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड संदीप पाटील यांनी सांगितले.
सदर वृक्ष तोडीच्या संदर्भात संस्था चालकांची व कर्मचाऱ्यांची धावपळ व पळापळ पाहून
घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात आल्या नंतर दि. २२ जुलै रोजी संस्थे तर्फे चोपडा नगर परिषद येथे मागील तारखेचे (बॅक डेटेट) अर्ज टाकण्या करता अतिक्रमण विभागाचे आत्माराम बाविस्कर यांचाकडे आले असल्याचे समजते.
माजी नगराध्यक्ष असलेल्या ऍड संदीप पाटील यांचा संस्थेशी निगडित विषय असल्यामुळे नगरपालिका कर्मचारी बोलायला तयार नसल्याचे व सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तब्बल ८ दिवस उलटूनही पंचनामा होत नसल्याने वृक्ष प्रेमीमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. नगरपालिका प्रशासन कारवाई करणार का ? अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे …













