अवैध गुरांची वाहतूक करणाऱ्या पिकप गाडी जप्त चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
चोपडा दि.२६ जुलै रोजी रात्री २:१५ वाजेचा सुमारास चोपडा अकुलखेडा रस्त्यावरील बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ आरोपी नामे विष्णु बबन चांदलकर हा त्याचे ताब्यातील एक पांढऱ्या रंगाची महिन्द्रा पिक अप चार चाकी मालवाहू गाडी क्रमांकMH-21-BH-4169 हीचेत 3 गाय व । गोन्हा असे एकूण 4 गुरे त्यांना वेदना होतील अशा प्रकारे कोंबून आखुळ दोरखंडाने नखळून त्याची चारा पाण्याची सोय न करता त्यांना क्रूर रित्या बांधून त्यांची वाहतूक करत असताना मिळून आल्या प्रकरणी प्राण्यांना कुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1) (घ) (ड) (च) (ज) सह मो.व्ही. अॅक्ट कलम 83/177, सह मु.पो.का. कलम 119 प्रमाणे,चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांचा मार्गदर्शनात पो.ना.संदीप भोई करत आहे .















