गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला मारहाण करून शिवीगाळ केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल

गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला मारहाण करून शिवीगाळ केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल

चोपडा दि.२६ जुलै रोजी रात्री २वाजेचा सुमारास चोपडा ते शिरपुर रोडवरील बंद पडलेल्या टोलनाका जवळ फिर्यादी विष्णु बबन चांदलकर वय २३ वर्षे धंदा ड्रायव्हर रा. बाणेगाव ता.भोकरदन जि.जालना हा ताब्यातील महिन्द्रा पिक अप चारचाकी मालवाहु गाडी क्रमांक MH-२१-BH-४१६९ ही रोडचे बाजुला थांबवुन लघवी करण्याकरीता खाली उतरला असता अनोळखी ५ ते ६ इसम त्यातील काहींचे नाव निखिल चित्रकथी, निलेश सोनवणे, सत्यम असे बोलत असलेले यांनी गायी, गुरे वाहतुक करतो असे बोलुन गर्दी करुन फिर्यादीस शिविगाळ करुन लाथा बुक्यांनी फिर्यादी यांचे पोटावर, पाठीवर, छातीवर, तोंडावर, कपाळावर मारहाण करुन दुखापत केली तसेच यापुढे गायी, गुरे वाहतुक करतांना मिळुन आला तर तुला जिवंत सोडनार नाही असा दम दिला म्हणून भा.न्या.सं.२०२३ चे कलम १८९(१),१८९(२)१९०,१९१(२),११८(१),११५(२), ३५१(२),३५१(३),३५२, प्रमाणे.चोपडा शहर पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांचा मार्गदर्शनात पोहेका संतोष पारधी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More