धरणगाव येथील शेतात कामाला जात असलेल्या महिलांच्या गाडीला अपघात एका महिलेचा जागीच मृत्यू तर ७ महिला जखमी …

धरणगाव प्रतिनिधी :- योगेश पाटील

धरणगाव शहराजवळील कृषिउत्पन्न बाजार समिती जवळ शेतात जात असलेल्या शेतमजूर महिलांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली.अपघातात १ महिला जागीच ठार झाली असून ७ महिला व चालक सुद्धा यात गंभीर जखमी झाले आहे अशी माहिती समोर येत आहे.


सविस्तर वृत्त असे की आज सकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान चारचाकी वाहनाने शेत मजूर महिला शेतात कामास जात होत्या, परंतु कृषिउत्पन्न बाजार समिती जवळ अचानक वाहन पलटी झाले व त्यातील महिला व चालक यांना दुखापत झाल्याचे वृत्त आहे. अपघातग्रस्तांच्या नातेवाईक तात्काळ ग्रामीण रुग्णालयात येऊन घटनेची माहिती घेत असल्याचे निदर्शनास आले त्यात चंद्रकलाबाई महाजन या जागीच मृत झाल्या आहेत तर सुमन महाजन,माधुरी महाजन,स्वाती महाजन,निनाबाई महाजन,जिजाबाई महाजन, ठगुबाई महाजन व महेंद्र पाटील हे जखमी आहेत त्यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जखमींना जळगाव येथ रवाना करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More