चोपडा उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी डॉक्टर नसल्याने गरोदर महिलांची होतेय गैरसोय…. उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभाग वाऱ्यावर ….उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या आदिवासी महिलेला डॉक्टर नसल्याचे कारण सांगत रात्री बारा वाजता जिल्हा रुग्णालयात जाण्याचा अजब सल्ला

चोपडा उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी डॉक्टर नसल्याने गरोदर महिलांची होतेय गैरसोय…. उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभाग वाऱ्यावर ….
उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या आदिवासी महिलेला डॉक्टर नसल्याचे कारण सांगत रात्री बारा वाजता जिल्हा रुग्णालयात जाण्याचा अजब सल्ला

चोपडा प्रतिनिधी :-
चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालय हे फक्त नावापुरतेच राहिले का ? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. मागील महिन्यात असाच प्रकार घडल्यामुळे डॉ चंद्रहास पाटील यांना कार्यमुक्त करण्यात आले होते .त्या घटनेला महिना होत नाही तोपर्यंत पुन्हा तसाच प्रकार दि १ ऑगस्ट रोजी उपजिल्हा रुग्णालयात घडला आहे.
मोरचिडा येथील आदिवासी महिला चिंकीबाई नरेश पावरा ह्या आदिवासी महिलेला संध्याकाळी साडे सात वाजता १०८ रुग्ण वाहिके द्वारे प्रसुती वेदना होत असल्यामुळे लासूर येथून चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र रात्री बारा वाजता सिजर करावे लागेल व सिजर करणारे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नसल्याचे कारण सांगत रात्री बारा वाजता १०८ रुग्ण वाहिकेतून जिल्हा रुग्णालयात रात्री दोन वाजता दाखल करण्यात आले.जिल्हा रूग्णालयात सदर महीला नॉर्मल डिलेव्हरी झाली. सुदैवाने आई व बाळ सुखरूप असल्याची माहिती नातेतवाईकांनी महाराष्ट्र 9 शी बोलताना सांगितले.


आदिवासी महिलेला जळगाव हलवण्या अगोदर जनसेवा हॉस्पिटलचे संचालक डॉ चंद्रकांत बारेला यांच्याशी नातेवाईकांनी फोन वर संपर्क केला असता फोन वर सिजर साठी कमीत कमी २८ हजार रुपये खर्च येईल अशी माहिती फोन वर डॉ बारेला यांनी दिली .पेशंटची आर्थिक परिस्तिथी नसल्यामुळे रात्री बारा वाजता आदिवासी महिलेला जीव मुठीत घेऊन जिल्हा रुग्णालयात जावे लागले. उपजिल्हा रुग्णालयात मागील महिन्यात डॉक्टर असून पण नॉर्मल डिलेव्हरी साठी जळगाव येथे हलविण्यात आले होते. उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा असून जर गरीब व गरजू गर्भवती महिलांना उपचार मिळत नसेल तर त्यांनी कुठे दाद मागावी अशी संतप्त प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले… उपजिल्हारुग्णालय प्रभारी उपअधिक्षक डॉ सुरेश पाटील …

घडलेल्या प्रकार संदर्भात डॉ सुरेश पाटील यांच्याशी फोन वर संपर्क केला असता पेशंटला वेदना असहाय्य होत होत्या व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे डॉ. सागर पाटील यांनी महिलेला जिल्हा रुग्णालयात पाठवले अशी माहिती प्रभारी उपअधिक्षक डॉ सुरेश पाटील यांनी सांगितले. डॉ चंद्रहास पाटील यांना मागील प्रकरणात कार्यमुक्त केल्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे महिलेची गैरसोय झाली असल्याचे ह्या वेळी डॉ सुरेश पाटील यांनी सांगितले.
शासकिय रूग्णालयात सर्व सोयी सुविधा असूनही गरीब, गरजू व आदिवासींना त्यांच्या हक्काच्या सुविधांपासून वंचित राहावे लागत असेल आणि डॉक्टर मंडळी आपले कर्तव्य परिपूर्ण पार पाडत नसतील तर मग शासकिय रूग्णालय कोणासाठी आणि कशासाठी असा प्रश्न सुज्ञ नागरिक विचारत आहेत. चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची अनुपस्थिती व सोयी सुविधांबद्दल दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत तरी जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More