लग्नाचे आमिष दाखवत 32 वर्षीय महिलेवर अत्याचार #चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चोपडा (प्रतिनिधी) शहरात एका भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून पीडितेला आणि तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एकाविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली महिती अशी कि, शहरातील एका परिसरात ३२ वर्षीय महिला आपल्या मुलाबाळांसह वास्तव्याला असून संशयित नीळकंठ गंभीर शिरसाठ याने महिलेचा विश्वास संपादन करून २०२२ ते १२ ऑगष्ट २०२४ दरम्यान वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवीत शारीरिक संबंध निर्माण केले यांनतर महिलेला संशयित नीलकंठ शिरसाठ याने यापुढे मला फोन करू नको असे सांगून तुला आणि तुझ्या मुलांना मारून टाकेल अशी धमकी दिली .

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने चोपडा शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय, सांहीता. कलम. 69,351(2) (3). प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वालटे करीत आहे.













