कलकत्ता येथील डॉक्टर महिलेवर झालेला अन्याय आणि खुन,बदलापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपिंना फाशीची शिक्षा द्या  रॉयल एजन्सी ग्रुपचे चोपडा शहर पोलीस ठाण्यात निवेदन

कलकत्ता येथील डॉक्टर महिलेवर झालेला अन्याय आणि खुन,बदलापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपिंना फाशीची शिक्षा द्या  रॉयल एजन्सी ग्रुपचे चोपडा शहर पोलीस ठाण्यात निवेदन

         भारत देशातील कलकत्ता येथील आर.जी. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मधील एका महिला डॉक्टर सोबत नराधम इसमाने पाशवी कृत्य करून नंतर त्या महिलेचा निर्घृण खून केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.तशीच लज्जास्पद घटना आज पुन्हा बदलापूर ( मुंबई ) महाराष्ट्रात घडली आहे.या घटननांनी माणुसकीला काळीमा फासला असून समाजमन सुन्न झाले आहे.

या घटनेविरोधात जनमानसात प्रचंड रोष असून जीव वाचवणारे डॉक्टर देखील या देशात आता सुरक्षित नाहीत ही भावना वेदनादायक आहे.तरी या दोनही घटनेतील आरोपींना तात्काळ फासावर लटकवा अशी मागणी निवेदनाद्वारे  रॉयल एजन्सी(ग्रुप) चे संचालक सैय्यद अमजद भाई यांनी चोपडा शहर पोलिस ठाण्यात केली यावेळी अधिकार दगडू पाटील,अनिल ओंकार बारी , निलेश दत्तू बारी ,डॉ रोहन महेंद्र पाटील,लालसिंह विश्वनाथ सोनवणे ,जय विनोद चौधरी ,सैय्यद ऐफत अली ,हर्षल पाटील ,मुकेश को‌‌ळी,मिलिंद सोनवणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More