उत्तर प्रदेशातील 24 वर्षीय युवकास 4 किलो गांजा सह चोपडा शहर पोलिसांनी केली अटक
चोपडा शहरामधील बसस्टँड परीसरामध्ये एक उत्तरप्रदेश येथील इसम स्वतःचे कब्जात गांजा बाळगुन फिरत असल्याबाबत व बसने निघुन जाण्याच्या तयारीत असल्याबाबत चोपडा शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना दिनांक २०/०८/२०२४ रोजी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.

त्याअनुषंगाने चोपडा शहर पोलीस ठाणेच्या पथकाने सापळा रचुन दिनांक २०/०८/२०२४ रोजी रात्री११: ३० वा चे सुमारास चोपडा बस स्टैंड परीसरात मिळुन आलेला इसम नामे रामकिशन मुनीब चौहान, वय २४ वर्षे, धंदा मजुरी, रा. दुबारी, तहसील मधुबन, थाना मधुबन, जि. महु, उत्तरप्रदेश यास त्याच्या कब्जातील ४ किलो १०० ग्रॅम गांजासह पकडले असुन त्याचेवर चोपडा शहर पोलीस ठाणे ३९४/२०२४ एन डी पी एस अॅक्ट कलम ८ (c) सह २० (b) (ii) (B) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयामध्ये मिळुन आलेल्या इसमास अटक करण्यात आले असुन त्यास दिनांक २१/०८/२०२४ रोजी मा. न्यायालयासमोर रिमांडकामी हजर केले असता त्यास दिनांक २३/०८/२०२४ रोजीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेले आहे. सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे हे करत आहेत














