चोपडा तालुक्यात अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार #चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
चोपडा तालुक्यातील एका गावात आदिवासी समाजातील बारा वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घटना उघडकीस आली आहे .

आरोपी सौरव महेंद्र पाटील दि 23 ऑगस्ट रोजी दुफारी १२ ते २ वजेचा दरम्यान गावातील महाविद्यालया जवळील मक्याचा शेतात बारा वर्षीय आदिवासी मुलीचा हात धरून मक्याचा शेतात घेऊन जाऊन अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात भा.न्या.सं.२०२३ चे कलम ६४(१), ३५१ (२) (३), तसेच अनु. जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम १९८९ चे कलम ३(१)(W)(i)(ii), ३(२) (v) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८ प्रमाणे.गुन्हा दाखल करण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आले आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करत आहे














