१३ जिल्ह्यातील १७ संवर्ग आदिवासी पेसा पदभरतीतील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी बांधवांनी केले रास्ता रोको आंदोलन
आज दि.26/8/2024 चोपडा येथे आमच्या आदिवासी बांधवांच्या 13 जिल्ह्यातील 17 संवर्ग आदिवासी पेसा पदभरतीतील सुप्रीम कोर्टाचा कुठलीही स्थगिती नसतांनाही भरती प्रक्रिया का थांबवण्यात आलेली आहे आदिवासी समाजाची कुठेतरी फसवणूक होत आहे प्रशासनाने आमची पेसाभरती जाणून बुजून स्थगिती दिलेली आहे.


दोन-चार दिवसात 17 संवर्गाच्या कायमस्वरूपी आणि तात्काल नियुक्ती देण्यात यावी यासाठी आमचे आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी आज दि.26 रोजी तिरंगा चौकात जनआक्रोश रास्ता रोको आंदोलन भर पावसात सुरू होता त्या ठिकाणी तालुका उपनिरीक्षक पोलीस अधिकारी व तहसीलदार साहेब यांच्या विनंती वरून हे जन आक्रोश आंदोलन तात्पुरता स्थगिती घेण्यात आलेली आहे जर आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही पुन्हा रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा देण्यात आलेला आहे .

ज्योती पावरा माझी जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष ,रामचंद भादले माझी सभापती , ज्ञानेश्वर भाऊ एकलव्य संघटनेचे अध्यक्ष,नामा पावरा जळगाव ग्रामीण अध्यक्ष,सुनील भिल,सोमनाथ भिल ,अनिल पावरा,सागर सांगोरे , नयब तडवी,कारण बारेला, रमोद पावरा आंदोलनाच्या ठिकाणी हे पदाधिकारी उपस्थिती होते













