दहीहंडी उत्सव समिती तर्फे माजी आमदार जगदीशभाऊ वळवी यांचा हस्ते २११११ हजाराचा धनादेश…

दहीहंडी उत्सव समिती तर्फे माजी आमदार जगदीश भाऊ वळवी यांचा हस्ते २११११ हजाराचा धनादेश…

चोपडा प्रतिनिधी

चोपडा येथे दि.२७ रोजी गांधी चौकात आयोजित दहीहंडी उत्सव समिती तर्फे जमिनीपासून २१ फूट उंच असलेली दहीहंडी अरुण नगरातील न्यू एकता मंडळाने चार मनोरे लावून पवन सुनील पाटील ‘गोविंदा’ ठरला. त्याने हवेत जोशपूर्ण उडी मारून दहीहंडी फोडल्याबरोबर कार्यक्रमात सहभागी
असलेल्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला होता.

उडी मारून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पवन सुनील पाटील एका रात्रीत सोशल मीडियावर संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला. दहीहंडी उत्सवात दहीहंडी  फोडणाऱ्या पथकाला आज दि.२९रोजी माजी आमदार जगदिशभाऊ वळवी यांचा निवासस्थानी दहीहंडी फोडणाऱ्या विशाल भाऊ पाटील युवा मंच अरुण नगर चा राजा न्यु एकता ग्रुप ला जगदीश भाऊ वळवी परिवारातर्फे २११११ रुपयाचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दहीहंडी फोडणाऱ्या पथकातील पवन पाटील किशोर पाटील ,आबा चौधरी, आबा जोशी, गणेश पाटील ,जयेश महाजन, बंन्टी महाजन ,नितीन पाटील ,अंकुश लोहार, तानाजी पाटील, दर्शन कोळी, सुमित बागुल ,सचिन पाटील, सचिन चौधरी ,आनंद पाटील ,गौरव पाटील ,राहुल पाटील, सनीपान पाटील ,राकेश पाटील, गोपाल नेवे, भुषण कोळी, सौरभ पाटील, यांचा सह दहीहंडी उत्सव समितीचे पदाधिकारी सुनील पाटील, चेतन वळवी , ऍड राजश्री वळवी,भटु पाटील,जितेंद्र शिंपी,मनोज अग्रवाल,अरुण जैस्वाल ,नितीन बिरारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More