लोकसहभागातून २०० वर्ष जुने गोल मंदिर चे काम पूर्ण ♦️डिसेंबर महिन्यात मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार ♦️दानशूर व्यक्तींचे मदतीचा ओग सुरूच गुप्त दानात ११ लाख रुपये प्राप्त

लोकसहभागातून २०० वर्ष जुने गोल मंदिर चे काम पूर्ण♦️डिसेंबर महिन्यात मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार♦️दानशूर व्यक्तींचे मदतीचा ओग सुरूच गुप्त दानात ११ लाख रुपये प्राप्त

चोपडा शहरातील २०० वर्ष जुने गोल मंदिर नावाने ओळखले जाणारे मंदिराची लोक सहभागातून कायापालट करण्यात आली आहे चोपडा येथील काही मित्र मंडळींनी आठ महिने पाहिले सोशल मीडियावर चोपडा येथील पुरातन गोल मंदिराचा जिर्णोद्धार व्हायला पायजे अशी इच्छा व्यक्त केली होती त्याच चर्चेला प्रतिसाद देत चोपडा शहरा सह तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी यथा शक्ती प्रमाणे दान देत सोशल मीडिया वरील चर्चेला वास्तविक रूप आले सुरवातीला मंदिराचा बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू आठ दिवसात जमा झाले त्यानंतर बांधकाम कमिटी स्थापन करून मंदिराचा कामाला सर्वात झाली दानशूर व्यक्तीचे मिळालेल्या सहकार्याने गोल मंदिराचे काम अवघ्या सहा महिन्यात पूर्ण करण्यात आले त्यात साऊथ चे कारागिरांनी केलेले काम अप्रतिम झाले आहे  ह्या वेळी मंदिरासाठी २१ फुटी त्रिशूल एका शिव भक्तने गुप्त दान केले बांधकाम कमिटी सदस्यांनी जिथे जिथे मंदिर बांधकाम साठी दानशूर व्यक्तीं कडे  मागणी केली त्या सर्वांनी यथा शक्ती प्रमाणे सहकार्य मिळाले त्यामुळे मंदिराचे काम देखील वेळीच झाले असल्याची माहिती बांधकाम कमिटी सदस्य यांनी दिली.


१०० रुपये पासून ११ लाख पर्यंत सर्वांचे नाव तितक्याच सन्मानाने जाहीर केले जातात. काहि गुप्त येतात.दर महिन्याला हिशोब सादर केला जातो. सर्व व्यापारी, मजुरी करणारे लोकं, राजकारणी, अधिकारी इतकंच नव्हे तर चोपड्यातील परदेशीं असणारे तरुण देखील देणगी पाठवत आहेत. जशी एखादी चळवळ उभी रहावी तसच स्वरूप या कामाला आलं आहे. परिसरातील गोरगरीब देखील आपापल्या गल्लीत पैसे गोळा करून गल्ली च्या नावाने देणगी देत आहेत. डिसेंबर महिन्यात ९ तारीख मिरवणूक, १० ११ पूजा आणि १२ तारीख पूर्णहुती व प्राणप्रतिष्ठा सोहळात प्र.पु श्री सखारामजी महाराज याचे यांचा मार्गदर्शन आने मुल्हेर येथील भक्तीराज महाराज, प्र. पु श्री सुशील महाराज,प्र.पु जीवनआनंद महाराजी स्वामी नारायन मंदिर धुळे,महामंडलेश्वर प्र. पु  श्री जनार्दन हरी महाराजी फैजपुर,श्री राम हणुमानजी भक्त मंडल बलवाडि सुंदर कांड,मुंबई येथील भजन सम्राट पवन शर्मा, गायत्री धाम सेंधवा येथील प्र.पु श्री मेवालालजी पाटीदार हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहे.तसेच एकाच दानशूर व्यक्ती ने जवळपास ( अंदाजे ११ लाख रु गुप्तस्वरुपात दिले आहे) लोकांना प्रसाद द्यायचे नियोजन केल आहे. मंदिर कामापासून शहरात वेगळाच उत्साह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More