साखरपुड्याचा कार्यक्रमात पूर्वीचे प्रेम संबंधाचे फोटो दाखवत २२वर्षीय युवतीचा विनयभंग # चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

♦️साखरपुड्याचा कार्यक्रमात पूर्वीचे प्रेम संबंधाचे फोटो दाखवत २२वर्षीय युवतीचा विनयभंग ♦️चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

चोपडा शहरातील एका भागातील २२वर्षीय युवतीचा पवन सिताराम पारधी वय ३० वर्षे ह्या युवकाने साखरपुडा सुरू असताना धिंगाणा घालत विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका मंगल कार्यालयात साखरपुडा सुरु असतांना आरोपी पवन सिताराम पारधी साखरपुड्याचे ठिकाणी येऊन फिर्यादी हिचे नातेवाईकांना तुमचा मुलीचे माझा सोबत असलेले प्रेम संबंधाचे आरोपीच्या मोबाईल मध्ये असलेले फोटो दाखवून समाजामध्ये बदनामी केली, तसेच दिनांक ३०/०८/२०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजे सुमारास फिर्यादी घरात असतांना आरोपी हा घरात घुसुन फिर्यादीचा उजवा हात बळजबरीने धरुन फिर्यादीशी अंगलट करून फिर्यादीस मनास लज्जा उत्पन्न होवुन विनय भंग करुन फिर्यादी सोडवणेसाठी भाऊ आला असता त्याला देखील शिवीगाळी करून चापटा बुक्यांनी मारहाण करुन फिर्यादीस तुझे लग्न होवू देणार नाही मारुन टाकीन अशी धमकी दिली म्हणून भारतीय न्याय संहिता (बी एन एस) कलम ७४,३३३, ३५१(२), ३५२, ११५(२) व आयटी ॲक्ट अधिनियम ६६/ई) प्रमाणे. चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला अटक करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More