चोपडा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना ; १२ वर्षीय मुलीला अत्याचार करून दगडाने ठेचले !
चोपडा तालुक्यातील विरवाडे-मालापूर रस्त्यावर शनिवारी घडलेल्या अमानुष कृत्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. एका १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना तिच्या लहान बहिणीने गावकऱ्यांना सांगितल्यानंतर उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुकेश पूना बारेला (22) याला अटक देखील केली आहे

०७/०१/२०२४ रोजी दुपारी ०४.०० ते ०५.०० वाजेच्या दरम्यान माझी मूलगी वय १२ वर्ष ही इतर तीन मुली याचेसह विरवाडे शिवारातील आम्ही बढाईने केलेल्या शेतात निदणी करुन घरी परत चालत येत असतांना मुकेश पुन्या बारेला रा. मुळचा बलवाडी ता. वरला जि. बडवाणी (म.प्र) सध्या रा.पाटचारी जवळ चोपडा याने त्यांचे मागो माग येवुन विरवाडे शिवारातील बाध्या नाला येथे प हिला पकडून जवळच असलेल्या भगवान गोटू पाटील यांच्या कपाशी पिकाचे शेतात नेवून तिचे कपडे काढून नग्न करुन तिच्यावर जबरदस्तीने दुष्कर्म करुन तिच्या डोक्यात दगड टाकुन तिला ठार मारले व तिचा मृत देह कपाशीचा चा शेतात फेकून दिल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात
भा.न्या. स. कलम.६५,९६,१०३३१पोक्सो ४.८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करत आहे

जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या
घटनेनंतर मारेकऱ्याने पळ काढला होता. मात्र, तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. अखेर तो चोपडा- आडगाव रस्त्यावर पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला. जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिकारी कविता नेरकर हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिसांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले.













