मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत मुस्तुफा अँग्लो उर्दु हायस्कुल व ज्युनियर कॉलेज ला तृतीय क्रमांकाचे बक्षीस

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत मुस्तुफा अँग्लो उर्दु हायस्कुल व ज्युनियर कॉलेज ला तृतीय क्रमांकाचे बक्षीस…

चोपडा प्रतिनीधी :-
चोपडा येथील मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संयलीत मुस्तुफा अँग्लो उर्दु हायस्कुल व ज्युकॉलेज ला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तीसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे . या बद्दल संस्थेचे अध्यक्ष असगर अली महेबूब अली उपाध्यक्ष , सचीव चेअरमन व सर्व संचालकांनी प्राचार्य अब्दुल हक शेख अय्यूब व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले .

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदींबाबत जागृती करत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमाचा दुसरा टप्पा आता सुरू होणार आहे. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान राबवलेल्या पहिल्या टप्प्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आता हा दुसरा टप्पा सोमवारपासून ४ सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळांनी यात सहभागी होऊन पारितोषिके मिळवावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ या योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान राबवण्यात आला.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच आरोग्य, क्रीडा आदी घटकांबाबत जागृती करणे, तसेच शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे हे अभियानाचे उद्दिष्टे आहे.

या यशात शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचार्यांची मेहनत आहे . असे प्राचार्यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले पुढच्या वर्षी या स्पर्धेत प्रथम बक्षीस मिळाविण्यासाठी आम्ही प्रयत्न करु असे मत त्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More