आयडियल इंग्लिश अकॅडमी तर्फे विद्यार्थ्यांसाठी मेडिटेशन सेशनचे आयोजन ; विद्यार्थ्यांनी ओम शांती केंद्र येथे भेट देऊन घेतले ध्यानाचे धडे

आयडियल इंग्लिश अकॅडमी तर्फे विद्यार्थ्यांसाठी मेडिटेशन सेशनचे आयोजन ; विद्यार्थ्यांनी ओम शांती केंद्र येथे भेट देऊन घेतले ध्यानाचे धडे


चोपडा प्रतिनिधी :-
आयडियल इंग्लिश अकॅडमीतर्फे ध्यान (मेडिटेशन सेशन ) आयोजन करण्यात आले . आयडियल इंग्लिश अकॅडमी चे संचालक पद्माकर पाटील यांनी ध्यानाचे महत्त्व लक्षात घेऊन या तासिकेचे आयोजन केले .आयडियल इंग्लिश अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या सेशनचा लाभ घेतला.

सर्व विद्यार्थ्यांना सकाळी ओम शांती केंद्र चोपडा येथे ध्यानासाठी नेण्यात आले. ध्यान केंद्रात मंगला दीदी व तेजल दीदी व इतर सदस्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांसाठी खास वक्ता म्हणून आलेल्या तेजल दिदी यांनी विद्यार्थ्यांना ध्यानाचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासाठी काय करावे याचे महत्व सांगून विविध शॉर्ट ट्रिक्स दिल्या.

मंगला दीदी आणि विद्यार्थ्यांना नेहमी ध्यान करण्याची प्रेरणा दिली.घनश्याम पाटील (जी आर पाटील) सर यांनी विद्यार्थ्यांसाठी या शिबिराच्या आयोजनासाठी मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार व पुस्तिका देण्यात आली .या कार्यक्रमासाठी अश्विन चौधरी सर, दिगंबर पाटील सर ,मनोज पाटील सर, ओम शांती केंद्राचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More