गुजराथी वैष्णव समाज जिल्हाध्यक्षपदी गुजराथी चंद्रहास गुजराथी
पुष्टीमार्गिय गुजराथी वैष्णव समाज या संस्थेची गुरुवारी जळगावला सर्व साधारण सभा झाली. यात नूतन जिल्हाध्यक्षपदी चोपडा पीपल्स बँक तथा चोपडा साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रहास गुजराथी यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष विठ्ठल भगवानदास शाह यांनी पुढच्या काळासाठीची सूत्रे नूतन जिल्हाध्यक्ष चंद्रहास गुजराथी यांना सुपुर्द केली.

गुजराथी पुष्टिमार्गिय वैष्णव समाज नूतन कार्यकारणीत उपाध्यक्ष नयन
चीमनलाल सराफ, (धरणगाव), सचिव मितेश अशोकलाल पोतदार (चोपडा), सहसचिव मिरुल सुरेशचंद्र मेहता (जळगाव), कोषाध्यक्ष विक्रांत दीपक सराफ (जळगाव), सह कोषाध्यक्ष नैलेश ओछवलाल देसाई, संपर्कप्रमुख राजेंद्र सुंदरलाल खडायते यांच्यासह इतर १४ जणांचा समावेश करण्यात आला आहे. १० जणांना आमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

याप्रसंगी नूतन जिल्हाध्यक्ष चंद्रहास गुजराथी यांनी आपले मत मांडले, सतीश लाड यांनी सभेचे सूत्रसंचालन आणि आभार मानले.यशस्वितेसाठी प्रा.आर.बी. गुजराथी, प्रा.श्याम शाह, प्रशांत गुजराथी, सचिन गुजराथी, आनंद गुजराथी, राम हुंडीवाले आदींनी परिश्रम घेतले.













