जळगाव जिल्ह्यात आज वीस कोरोना बाधित रूग्ण आढळले जळगाव@317


जिल्ह्यात आतापर्यंत 320 कोरोना बाधित रूग्ण
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 19 – जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 45 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 20 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून तेवीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये धरणगावचे सात, भुसावळ येथील चार, जळगावचे अकरा, चोपडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 317 इतकी झाली आहे.

आज चोपडा येथील आदर्श नगर येथील 75 वर्षीय कोरोना बधित रूग्ण आढळला असून चोपडा येथील कोरोना बधितांची संख्या 14 झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More