चोपडा विधानसभा मतदार संघात चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार ?#उबाठाला पोषक वातावरण असताना प्रा.चंद्रकांत सोनवणे गेम चेंजर ठरणार का?
चोपडा प्रतिनिधी:-
चोपडा विधानसभा मतदार संघात सेना विरुद्ध सेना झालेल्या रंगतदार लढतीत कोण बाजी मारणार ? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
एकीकडे मागील १० वर्षापासून प्रा. चंद्रकांत सोनवणे तालुक्याचे धुरा सांभाळत आहेत. असे असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घोषित केलेला उमेदवार राजू तडवी यांना शेवटचा क्षणी थांबवून प्रभाकर आप्पा गोटू सोनवणे यांना उमेदवारी देऊन मोठे आव्हान उभे केले .त्यात युती धर्म पाळत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची भक्कम साथ मिळाल्याने वेळ कमी असताना सुद्धा संपूर्ण तालुका पिंजून काढला.

त्यामुळे ग्रामीण भागात उबाठा साठी पोषक वातावरण तयार झाले होते. ग्रामीण भागात उ बा ठा गटाचे प्रभाकर आप्पा गोटू सोनवणे यांनी मजबूत पकड निर्माण केल्याचे बोलले जात आहे.पण शहरी भागातील नियोजन चुकल्यामुळे त्याचा फटका बसू शकतो अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. मात्र प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी मतदानाचा दिवशी अचूक नियोजन करत ग्रामीण भागात होणारे नुकसान हे शहरी भागातून भरून काढण्यात यश मिळाल्याचे दिसून आले .त्याचा फायदा नेमका किती होणार ? हे तर निकाला नंतर स्पष्ट होईल.

दोन्ही गटातील मातब्बरांनी केलेल्या नियोजनाचा कोणाला फायदा किंवा नुकसान होईल हे तर निकाला नंतर स्पष्ट होईल… चोपडा विधानसभा मतदार संघातील मतदारात कही खुशी कही गम अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे… झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून अनेक मतदार व गोर गरीब जनतेचे चेहरे खुललेले असताना कोणत्या उमेदवाराचा चेहरा खुलतो आणि कोणत्या उमेदवाराचा चेहरा कोमेजतो हे येत्या २३ तारखेला चोपडा मतदार संघातील सुजाण मतदार ठरवणार आहेत… रुखो… जरा सब्र करो…. अंदाज गलत हो सकता है..













