महाराष्ट्राच्या माजी शिक्षणमंत्री स्व. शरदचंद्रिकाआक्का पाटील यांच्या 42 व्या स्मृती दिनी अभिवादन, 50 रक्तदात्यांनी केले रक्तदान..

महाराष्ट्राच्या माजी शिक्षणमंत्री स्व. शरदचंद्रिकाआक्का पाटील यांच्या 42 व्या स्मृती दिनी अभिवादन, 50 रक्तदात्यांनी केले रक्तदान..


महाराष्ट्र9 न्यूज नेटवर्क चोपडा


जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील
महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री व तंत्रशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या स्व. शरदचंद्रिकाआक्का पाटील यांचा दिनांक 5 डिसेंबर रोजी 42 वा स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले. चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ आवारातील त्यांच्या स्मृतिस्थळावर सकाळी 8.30 वाजेपासून ते 12.00 वाजेच्या दरम्यान हजारो लोकांनी श्रद्धांजली वाहून अभिवादन केले. सर्वप्रथम महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड संदीपभैय्या सुरेश पाटील, सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील, माजी आमदार कैलास पाटील, कृ उ बा स चे माजी सभापती सुरेश पाटील, आक्कांच्या मोठ्या कन्या शैलेजाताई पाटील,जावई डॉ.अशोक पाटील (सटाणा),शुभांगीताई पाटील,कारखान्याचे माजी चेअरमन ॲड. घनश्याम पाटील, अतुल ठाकरे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष छन्नु झेंडू पाटील, चोपडा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, चहार्डी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.सुरेश श्यामराव पाटील,विवेकानंद प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष व धन्वंतरी डॉ.विकास हरताळकर, नृसिंह हॉस्पिटलचे संचालक डॉ.दीपक पाटील यांचे सह हजारो प्रतिष्ठित, जेष्ठ आणि श्रेष्ठ अश्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माजी शिक्षण मंत्री शरदचंद्रिका आक्का पाटील यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली.

श्रद्धांजली अर्पण करण्यावेळी जळगाव जिल्ह्यातील व चोपडा तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील, सांस्कृतिक क्षेत्रातील, वैद्यकीय क्षेत्रातील, पत्रकारिता क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रात,शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठित अश्या विविध स्तरातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.
तसेच दिनांक 4 रोजी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या तंत्रनिकेतन विभागात 50 रक्तदात्यांनी शरदचंद्रिका आक्का पाटील यांचा स्मृतिदिवस निमित्ताने रक्तदान केले.


त्यामुळे गरजूंना रक्ताची व्यवस्था ही त्या निमित्ताने झाली, ही विशेष बाब आहे. रक्तदान शिबिराचे उद्घाटन महात्मा गांधी शिक्षण मंडळ संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.श्रद्धांजली वाहण्यासाठी ॲड. रवींद्र जैन, डॉ जयंत पाटील, पंकज बोरोले,काँग्रेस चे तालुका अध्यक्ष संजीव गुलाबराव सोनवणे, माजी मुख्याध्यापक टी. एम. चौधरी,एम व्ही पाटील,डॉ डी. ए. सूर्यवंशी,मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे,श्री एस.एस.पाटील,अशोक साळुंखे,दिलीपराव साळुंखे
गिरीश पाटील, ग.स. चे संचालक योगेश सनेर, रावसाहेब मांगो पाटील,एकनाथ पाटील,प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी, गोविंदा महाजन, अकबर पिंजारी, कृती समितीचे मुख्य प्रवर्तक श्री. एस बी पाटील, अमृतराव वाघ, प्रमोद पाटील, डॉ बी. आर. पाटील, रमाकांत सोनवणे, रमेश शिंदे,कैलास सोनवणे, रवींद्र पाटील,राजू दगा कोळी, गोपाळ धनगर, अशोक पाटील, राजेंद्र गंगाधर पाटील, प्रदीप पाटील, श्री के. डी. चौधरी,रमेश सोनवणे,
उल्हास पाटील, चंद्रकांत पाटील, डॉ महेंद्र जैस्वाल, लीना जैस्वाल, डॉ लोकेंद्र महाजन, शांताराम पाटील,माजी सभापती ॲड.डी.पी.पाटील,डॉ.वैभव पाटील,दगा कोळी,प्रकाश आनंदा पाटील,सुधाकर रघुनाथ पाटील,डॉ.हनुमंत सूर्यवंशी,अनिल हिम्मत पाटील, जगन्नाथ बाविस्कर,देविदास साळुंखे,डॉ रवींद्र पाटील, अजबराव पाटील,ॲड.धर्मेंद्र सोनार,नंदकिशोर सांगोरे,नंदकिशोर पाटील,डॉ.चंद्रकांत बारेला,डॉ पराग पाटील डॉ रवींद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, देवेंद्र पाटील, मनीष गुजराथी, ऍड एस. डी. पाटील, अशोक पाटील, डॉ. धर्मेंद्र पाटील, राजेंद्र सोनवणे, अरुण कंखरे, विकास शिर्के, डॉ विनीत हरताळकर, डॉ अमित हरताळकर, संतोष अहिरे, नंदकिशोर पाटील, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील (बिटवा), शहराध्यक्ष किशोर चौधरी, नगरसेवक रमेश शिंदे, हुसेनखा पठाण, राजू शर्मा, जगन्नाथ बाविस्कर, किशोर पाटील, प्रा. माया साळुंखे, प्रा. संदीप पाटील, प्रा.आर.आर.पाटील, एच बी मोरे, किशोर चौधरी, शशी देवरे, प्रदीप पाटील, राजेंद्र साळुंखे, बालमोहन चे अध्यक्ष चंद्रकांत गुलाबराव पाटील, सतीश बोरसे,अनिल कदम,राजेंद्र पाटील,चंद्रकांत लोटू पाटील, यांचेसह हजारो प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More