जळगाव जिल्ह्यात आज ५ कोरोना बाधित रूग्ण आढळले;जळगाव@ ३५१

जिल्ह्यातील अमळनेर, जळगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, ‘जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्ती पैकी 49 व्यक्ती तपासणी अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाले आहे. त्यापैकी 44 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर पाच व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावातील दोन तर अमळनेर, भडगाव, धरणगावातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्ण संख्या 351 इतकी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More