भुसावळ येथे इंडोफिल कंपनीचा बनावट एम ४५ बुरशीनाशक उत्पादन करण्यावर कृषि विभागाची कारवाईत 3लाख 87 हजाराचा  रुपयाचा मुद्देमाल जप्त

इंडोफिल कंपनीचा बनावट एम ४५ बुरशीनाशक उत्पादन करण्यावर कृषि विभागाची धडक कारवाई
वाल्मिक नगर,भुसावळ येथे इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड,मुंबई या कंपनीचे मॅंकोझेब ७५% WP हे शेतीपयोगी बुरशीनाशक एम ४५ नावाने अधिकृत विक्री होत असते. सदर कंपनीचा लोगो,ब्रँड नेम,समान रंग संगती असणारे पाकिटे तयार करून बनावट एम ४५ बुरशीनाशक शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी तयार करण्यात असल्याचे गोपनीय सुत्रा नुसार जिल्हा गुण नियंत्रण पथकातील अधिकारी विकास बोरसे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक व विजय पवार जिल्हा मोहीम अधिकारी यांना समजले.


विभागीय कृषी सहसंचालक मा. सुभाष काटकर ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी,कृषी विकास अधिकारी श्री पद्मनाभ म्हस्के व पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले.
संशयित आरोपी यांच्या वाल्मिक नगर भुसावळ येथे पोलिस पथक व गुणनियंत्रण पथकातील सदस्य यांनी छापा टाकला असता विना परवाना बुरशीनाशक उत्पादन,साठवणूक करत असल्याचे आढळून आले.
सदर छाप्यात बनावट एम ४५ बुरशीनाशक पाकिटे १०१०,बुरशीनाशक म्हणून वाल पुट्टी च्या बॅग,सिलिंग मशीन, बनावट पाकिटे इ. एकूण ३८७३६०/-रकमेचा मुद्देमाल सापडला आहे.


संशयित आरोपी याना परवाना व उत्पादन विषयी कागदपत्रे व पुरवठादार यांच्या विषयी माहिती विचारली असता ते देऊ शकले नाही.
सदर संशयित बनावट साठा जप्त करून,नमुने घेण्यात आली व बाजारपेठ पोलिस स्टेशन,भुसावळ येथे अधिकृत उत्पादक यांच्या वतीने श्री प्रदीप झा यांनी फिर्याद दाखल केली.


सदर कारवाई दरम्यान प्रदीप द्याडे कृषी अधिकारी पंचायत समिती भुसावळ,मानसिंग भोळे कृषी सहायक भुसावळ,सुमन राठोड म पो कॉ ,प्रशांत परदेशी यांचे सहकार्य लाभले.
पुढील तपास मंगेश जाधव पोलिस उपनिरीक्षक भुसावळ हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More