राज मोहम्मद खान शिकलगर यांना राष्ट्रपिता म.गांधी पुरस्कार प्रदान,,,,

राज मोहम्मद खान शिकलगर यांना राष्ट्रपिता म.गांधी पुरस्कार प्रदान,,,,

जळगांव जिल्ह्यातील आदिलशाह फारुकी ब.उ.संस्थेच्या वतीने दि.२९ रविवारी जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे मोठ्या थाटामाटात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.


राज मोहम्मद खान शिकलगर यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी लोक सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुस्लिम समन्वयक समिती अध्यक्ष तथा मण्यार बिरादरीचे जिल्हाध्यक्ष मा.फारुख शेख होते.


कार्यक्रमात प्रामुख्याने पाचोरा भडगावचे माजी आमदार दिलीप ओंकार वाघ, काँग्रेस नेते मुफ्ती हारून नदवी,अब्दुल मजीद जकरिया,  राम रहीम रियल इस्टेट संचालक हकीम आर चौधरी,प्रहार अपंग क्रांतीच्या समिना शेख सातारा, मुजमिल खान,फारूक पटेल सर,डोंगरे अ. नगर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक पत्रकार अली अंजुम रिजवी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ जावेद शेख यांनी केले, आयोजक फारुख शाह नौमानी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More