दिव्यांग निधी वाटपासाठी नगरपरिषद प्रशासक यांची दिरंगाई नईम शेख यांचे नगर परिषदेला निवेदन..
चोपडा नगर परिषद येथे प्रशासक नियुक्ती पासून चोपडा येथील दिव्यांग नागरिकांना दरवर्षी नगर परिषदेच्या उत्पन्नातून दिला जाणारा पाच टक्के निधी देणे वेळेवर मिळत नसल्या मुळे दिव्यांग्यान मधे नाराजी व्यक्त केली जात आहे .

सन २०२३-२४ पासून दिव्यांगांच्या खात्यात चोपडा नगर परिषद यांनी अद्याप ही दिवांगांच्या निधी त्यांचे खात्यात जमा केले नाही. आणि चोपडा नगर परिषद मार्फत दिव्यांगांना गिरणी, शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन वाटप करावयाचे होते. परंतु ते वाटप झालेले नसून ते त्वरित आपल्या कार्यालयाकडून वाटप करण्यात यावे. जेणेकरून त्यांना त्यांचे हक्काचे लाभ मिळणे शक्य होईल आणि त्यांना त्यांचे जिवन सुलभपणे जगता येईल. अशी दिव्यांग जनांची लाभाची बाब लक्षात घेवून त्यांना त्यांचा हक्क मिळण्यात यावे असे निदर्शनास आणून देण्यासाठी शेख नईम राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) युवक तालुका उपध्यक्ष यांनी उपमुख्य अधिकारी संजय गोपाल मिसर यांना सदरील निवेदन देण्यात आले आहे नागरिकांना योजनेचे लाभ लवकर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नईम शेख यांनी दिला आहे यावेळी सुनील दहीवलकर ,अस्लम खान उपस्थित होते .














