चोपडा येथे सी.सी.आय मार्फत कापुस खरेदी सुरु
चोपडा :- सीसीआय आणि कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे शहरातील राधे राधे
जिनींग फॅक्टरीमध्ये हमीभावाने कापुस खरेदीस दिनांक ०६/०१/२०२५ वार सोमवार रोजी शुभारंभ प्रसंगी तालुक्याचे आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांचे हस्ते काटा पुजन व कापुस मालाचे पुजन करण्यांत आले असुन चंद्रकांत सोनवणे यांनी कापूस खरेदी वेळी शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याबाबत केंद्र प्रमुख यांना निर्देश दिले .

सदर शुभारंभ प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक घनश्यामभाऊ अग्रवाल, सी.सी.आय चे केंद्र प्रमुख योगेश थाळनेरकर बाजार समिती सभापती नरेंद्र वसंतराव पाटील, उपसभापती विनायकराव रामदास चव्हाण, संचालक सुनिल जैन,अँड. घनश्याम पाटील,गोपाल पाटील,अँड. शिवराज पाटील ,किरण देवराज ,मिलींद पाटील, वसंत पाटील, श्री. मनोज सनेर (विक्की डाँ), नंदकिशोर सांगोरे, सुनिल अग्रवाल जिनींग मालक अशोक अग्रवाल, विक्की अग्रवाल, इतर मान्यवर, शेतकरी वर्ग बाजार समितीचे सचिव,रोहिदास सोनवणे, उपसचिव जितेंद्र देशमुख, नितीन बडगुजर, हे उपस्थित होते














