धक्कादायक जळगाव जिल्ह्यात आणखी 26 कोरोना बाधित आढळले ;जळगाव@414

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 414 झाली

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 23 जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, वरणगाव, धरणगाव पारोळा येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 114 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 88 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सव्वीस व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील 21, वरणगावचे 3, चाळीसगाव व पारोळा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 414 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

चोपडा येथील एकूण ३६ रिपोर्ट पैकी पाच रिपोर्ट आले आणि ते निगेटिव्ह आहेत,३१ रिपोर्ट अजून अप्राप्त आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More