रात्री उशिरा प्राप्त अहवाला नुसार जिल्ह्यात पुन्हा 14 कोरोना बाधित आढळले; जळगाव@ 428

जळगाव जिल्ह्यात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्तीपैकी आज दिवसभरात 673 व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त. पैकी 626 अहवाल निगेटिव्ह तर 47 पाॅझिटिव्ह आले. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 428 झाली. पैकी 179 रूग्णांनी कोरोनावर मात केली तर 47 व्यक्तीचा मृत्यू झाला.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा आजपासून सुरू झाली आहे.

या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या कोरोना संशयित व्यक्तीपैकी आज 32 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 18 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 14 व्यक्तीचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींच्या निवासाची माहिती अप्राप्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More