चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची तत्परते मुळे अपघातग्रस्त दाम्पत्याला मिळाली तातडीची मदत!..

चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची तत्परते मुळे अपघातग्रस्त दाम्पत्याला मिळाली तातडीची मदत! 

आज चोपडा तालुक्यातील धानोरा पंचक गावाजवळ एक हृदयद्रावक अपघात घडला. MP 46 लाल रंगाच्या वाहनाने एका दाम्पत्याला जोरात धडक दिली आणि घटनास्थळावरून पसार झाले. या भीषण अपघातात दाम्पत्याच्या हात-पायांना गंभीर इजा झाली तसेच डोक्याला मोठा मार लागला होता. 

चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील आणि त्यांच्या टीमने दाखवलेली तत्परता
तात्काळ 108 ॲम्ब्युलन्सला कॉल करून लोकेशन शेअर केले. शेतकरी कुटुंब असलेल्या जखमी दाम्पत्याला सुरक्षित बाजूला हलवले. चोपड्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी  लासूरकर यांना संपर्क करून आणखी ॲम्ब्युलन्स मागवली. धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने हलवण्यासाठी मदत केली. चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या निरीक्षक  कावेरी कमलाकर यांना माहिती दिली व एम.पी ४६ लाल रंगाच्या वाहनाचा तपास सुरू केला. 


अपघाताच्या वेळी परिस्थिती: संबंधित वाहनाने मुख्याधिकारी यांच्या शासकीय वाहनाला ओव्हरटेक करताच समोर असलेल्या दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिली. मुख्याधिकारी आणि त्यांचे चालक उमेश यांनी तातडीने प्रसंगावधान राखत जखमींना मदत केली. 
अपघातग्रस्त दाम्पत्याचा जीव वाचवण्यात यश! अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध सुरू आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे जर कुणाला एम. पी. ४६ लाल रंगाच्या वाहनाबद्दल माहिती असेल, तर कृपया तात्काळ पोलिसांना कळवा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More