सेंट्रल बँक ऑफ इंडिया परिसरातून ५५००० हजाराची रोकड घेऊन चोरटे पसार # चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

चोपडा शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया परिसरातून दि.२६ रोजी ११:३० ते११:४५ वाजेचा दरम्यान गजमल केशव पाटील रा.खाचणे तालुका चोपडा या ७५ वर्षीय यांचा कापडी पिशवीत ठेवलेले ५५००० रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली त्या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात अज्ञात विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे .पुढील तपास चोपडा पोलिस उपनिरीक्षक योगेश्वर हिरे करत आहे














