चोपडा येथील मुस्तफा अँग्लो उर्दू शाळेला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचा दणका जिल्हा शिक्षण अधिकारी यांना दिले चौकशी चे आदेश…

चोपडा येथील मुस्तफा अँग्लो उर्दू शाळेला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचा दणका जिल्हा शिक्षण अधिकारी यांना दिले चौकशी चे आदेश…

चोपडा येथील मुस्तफा अँग्लो उर्दू प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या संशयास्पद भरती प्रक्रियेविरोधात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने जिल्हा शिक्षण अधिकारी यांना दिले चौकशी चे आदेश…

हाजी चिरगोददीन इजाबुददीन, संस्थापक अध्यक्ष, मुस्तफा एज्युकेशन सोसायटी, चोपडा, यांच्याकडून प्राप्त झालेल्या निवेदनाची दखल घेत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग चे अध्यक्ष प्यारे खान यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी यांना संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत

चोपडा येथील मुस्तफा एज्युकेशन सोसायटी या संस्थेअंतर्गत चालणा-या अल्पसंख्याक दर्जाच्या मुस्तफा अँग्लो उर्दू प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा असून संस्थाचालकांनी बेकायदेशीर व नातेवाईक सभासद भरती व शिक्षक शिक्षकेत्तर भरती केल्याबाबत तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.उक्त नमूद बाब ही अल्पसंख्याक समाजाशी संबंधित असल्याने सदर प्रकरणाची अल्पसंख्याक आयोगास दखल घेणे क्रमप्राप्त ठरल्याने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम, २०१२ कलम १० (क) नुसार सदर प्रकरणी तात्काळ कार्यवाही करुन त्याबाबतचा अहवाल आयोगास ८ दिवसांत सादर करण्यात यावा.
निर्धारित कालावधीत आपला अहवाल प्राप्त न झाल्यास कलम १० (क) नुसार सुनावणी आयोजित करुन सर्व संबंधितांना आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याकरिता आदेश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक चे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More