किरकोळ वादातून मारहाण भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण# चोपडा शहर पोलिस ठाण्यात चार जणांनवर गुन्हा दाखल..
चोपडा शहरातील आझाद चौक येथे घरा समोरून रिक्षा काढण्याचे सांगितल्याचे राग आल्याने दोन गटात मारहाण झाल्याच्याची घटना दि.२२ रोजी दुफारी दीड ते पावणे दोन वाजेचं सुमारास घडली भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करत १०ग्राम सोन्याची पोत हिसकवल्या प्रकरणी चार जणांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे


फिर्यादी शकिलबी आरीफ मलीक (वय ४६) यांनी दिलेल्या फिर्याद वरून दिनांक २२/०४/२०२५ रोजी दुपारी ०१.३० ते ०१.४५ वा. च्या सुमारास शकिलबी आरोफ मलीक यांचा गल्लीत राहणारे अक्रम अली सत्तार अली, अन्वर अली सत्तार अली, मुजफ्फर अली सत्तार अली, सैय्यद अली असलम अली सर्व रा दर्गाअली आझाद चौक चोपडा ता. चोपडा यांनी फिर्यादीचे घराजवळ लावत असलेली रिक्षा ही त्याचा घराजवळ लावण्यास सागीतल्याचा राग आल्याने आरोपीनी फिर्यादीचा मुलगा मुज्जु उर्फ मुजम्मील मलीक, मुलगा आकीब मलीक अशांना मारहान करीत असतांना शकिलाबी आरीफ मलीक हे त्यांचे भाडण सोडविण्यास गेली असता फिर्यादीस देखील आरोपी अक्रम अली सत्तार अली याने केस ओढले, आरोपी अन्वर अली सत्तार अली व मुजफ्फर अली सत्तार अली यांनी फिर्यादीस चापटा बुक्यांनी मारहान करत शकिलाबी आरीफ मलीक ओळखीत असलेल्या आरोपी सैय्यद अली असलम अली याने शकिलाबी आरीफ मलीक यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हिसकावून घेतली असुन आरोपी यांनी फिर्यादीस तसेच फिर्यादीच्या मुलाना शिवीगाळ करुन चारचाकी वाहन तसेच आमचे घर जाळून टाकण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा चोपडा शहर पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 119(1),115(2),352,351(2)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोउपनि, योगेश्वर किशोर हिरे करत आहे













