अ.भा.वि.प.तर्फे चोपड्यात पाकिस्तान व अतिरेक्यांच्या पुतळ्याचे दहन

अ.भा.वि.प.तर्फे चोपड्यात पाकिस्तान व अतिरेक्यांच्या पुतळ्याचे दहन


चोपडा – येथे पहलगाम येथे झालेल्या अमानुष अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि या भ्याड हल्ल्यात मृत झालेल्या २८ हिंदुस्थानी नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रीय विचाराच्या नागरिकांनी शिवाजी चौकांत एकत्र येवून पाकिस्तान विरोधात तिव्र घोषणा दिल्या.निर्घुण हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तान व अतिरेक्यांचा पुतळा यावेळी दहन करण्यात आला.तसेच विविध घोषणा देण्यात आल्या.तसेच अभाविप पूर्व कार्यकर्ते श्रीकांत नेवे श्रध्दांजली पर भुमिका मांडल्यानंतर उपस्थित शेकडो जणांनी मृतांना स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण केली.


यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर मंत्री मुकेश बडगुजर,महाविद्याल प्रमुख चेतन शेटे,कलामंच प्रमुख कौशिक वैद्य,एस.एफ.डी. प्रमुख भैरव सोनवणे,
हर्षल शिंपी,पूर्व कार्यकर्ते म्हणून गौरव सोनार,राजू शर्मा,रा.स्व संघ म्हणून तालुका कार्यवाह ज्ञानेश्वर सैंदाणे,भाजपचे तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील(पश्चिम),पिंटू पावरा(पूर्व),शहराध्यक्ष नरेंद्र पाटील,माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील,मनसेचे अनिल वानखेडे,सनातन संस्थेचे यशवंत चौधरी,माजी नगरसेवक राजाराम पाटील यांच्यासह भाजप,अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More