चोपडा तालुक्यातील तावसे येथे आंबा बागेत लपवलेया बोगस बियाण्यावर कृषी विभागाची धाड १२लाख ७२  हजाराचा मुद्देमाल जप्त…

चोपडा तालुक्यातील तावसे येथे आंबा बागेत लपवलेया बोगस बियाण्यावर कृषी विभागाची धाड १२लाख ७२  हजाराचा मुद्देमाल जप्त…


आज चोपडा तालुक्यातील तावसे येथे कृषी विभाग जिल्हा भरारी पथकाच्या कारवाईत प्रतिबंधित सुमारे अकरा लक्ष बाहतर हजार रकमेचे बनावट htbt कापूस बियाणे जप्त व संशयित संशयित आरोपी जीवनलाल विश्राम  चौधरी (ढेकू दादा ) यांच्यावर गुन्हा दाखल.

संशयित आरोपी जीवनलाल विश्राम चौधरी(ढेकू दादा)


जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी,कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के ,पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा नियोजन करण्यात आले.
जिल्हा भरारी पथकातील जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार मौजे कुरवेल येथील नदी किनारीआंब्याचा शेतात बनावट htbt बियाणे लपवून विक्री केले जात आहे असे समजले त्यानुसार उल्हास ठाकूर विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक, सदाशिव बारेला कृषी सहाय्यक, किरण गोसावी कृषी सहाय्यक, अर्चना पाटील पोलीस पाटील तावसे किरण पाटील कृषी अधिकारी,चेतन महाजन


पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील या पथकाने तावसे येथील संशयित आरोपी जीवनलाल चौधरी (ढेकू दादा )यांच्या तावसे बु हादीतील आंब्याच्या बागेत तपासणी केली आसता एका आंब्याच्या झाडा खाली गावातने झाकून ठेवले अनधिकृत, विनपर्वाना, प्रतिभंधित htbt कापसाचे योद्धा व सिल्वर R असे छापलेले 850 पाकिटे किंमत  12,72000 रुपयेचा साठा जप्त केला असून बियाणे कायदा,बियाणे नियम,अत्यावश्यक वस्तू अधिनियम,महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम,पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी फिर्याद दाखल केली तर पुढील तपास पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More