चोपडा बँक ऑफ इंडिया मध्ये आर डी चे चलन भरणाऱ्या वयोवृद्धच्या पिशवीतून ५० हजार रुपये चोरून महिला पसार..# घटना सी सी टीव्हीत कैद # चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

चोपडा बँक ऑफ इंडिया मध्ये आर डी चे चलन भरणाऱ्या वयोवृद्धच्या पिशवीतून ५० हजार रुपये चोरून महिला पसार..# चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

मधुकर पंढरीनाथ पाटील वय ६४ वर्षे राहणार त्र्यंबक नगर  यांनी दिलेल्या फिर्याद नुसार दि. १९रोजी दुपारी १२.३० वाजेचे सुमारास चोपडा शहरात एम.जी. कॉलेज समोर असलेल्या बैंक ऑफ इंडिया शाखा चोपडा येथे यातील फिर्यादी मधुकर पाटील  यांनी त्यांचे बैंक खात्यामधून ८०,०००/- रुपये रोख काढले व त्यांचे हातात असलेल्या प्लॅस्टीक पिशवित ठेवून बँकेत असलेल्या चलन काउंटरवर आर.डी.चलन भरत असतांना बँकेच्या CCTV फुटेज मध्ये दिसणाऱ्या  ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी ३ महिला यांनी संगणमताने यातील मधुकर पाटील यांचे हातात असलेली प्लॅस्टीक पिशवी अर्धवट कापून त्यात असलेल्या ८०,०००/-रुपयांपैकी ५०,०००/- रुपयांचे ५००/- रुपये दराच्या नोटांचे बंडल फिर्यादीचे संमतीवाचुन लबाडीच्या इराद्याने संगणमताने चोरून नेले प्रकरणी तीन अज्ञात महिलानं विरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात भा. न्या. सं. कलम ३०३ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांचा मार्गदर्शनात पोहेकों हर्षल पाटील करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More