कॅन्सरग्रस्त परिवारातील विध्यार्थ्यांना जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
चोपडा,
जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर तर्फे दरवर्षी प्रमाणे कॅन्सरग्रस्त परिवारातील विध्यार्थ्यांना आज चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचा हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या वेळी तहसीलदार साहेबांनी विध्यार्थ्यांची घेत असलेल्या शिक्षणाबद्दल माहिती घेतली व जन मानवता संस्था व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर चा या उपक्रमाचे कौतुक केले.


या वेळी जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर चे अध्यक्ष, राज मोहम्मद शिकलगर, सचिव, शेख जलीस अहेमद (इंजिनिअर), सदस्य, शेख सलीम जहागीरदार, शेख सत्तार वलियोद्दीन ठेकेदार, शेख एजाज खाटीक ,शेख जाफर शेख खालीक ,अयान खान शिकलगर उपस्थित होते














