जळगाव जिल्ह्यात आज आणखी चार कोरोना बाधित रूग्ण आढळले जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 459 झाली

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 – जिल्ह्यातील भुसावळ व चोपडा येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 55 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 50 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर चार व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा पुर्नतपासणी अहवालही पाॅझिटिव्ह आला आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये चोपडा येथील तीन तर भुसावळ शहरातील एका व्यक्तीचा आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 459 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 195 रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहे तर जिल्ह्यातील 54 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More