भारतीय जनता पार्टी चोपडा तर्फे स्वातंत्रवीर सावरकर जयंती साजरी

चोपडा – (प्रतिनिधी ) येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यालयात भाजपा तर्फे स्वातंत्रवीर सावरकर जयंती निमित्त प्रखर राष्ट्रवादी महान क्रांतीकारक,जाज्वल्य हिंदुत्वपुरस्करते असे विश्व हिंदुहृदय सम्राट स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस शहर अध्यक्ष तथा नगरसेवक गजेंद्र जैसवाल यांचे हस्ते माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.
या वेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष मा. देविदास पाटील (देवाबापू) शहर सरचिटणीस मनोहर बडगुजर , सुनील सोनगिरे, उपाध्यक्ष गोपाल पाटील, प्रवीण चौधरी युवामोर्चा सरचिटणीस रितेश शिंपी , व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष हेमंत जोहरी, ओबीसी सेल शहर अध्यक्ष सुरेश चौधरी, प्रसिद्धी प्रमुख यशवंत जडे, कार्यालयीन मंत्री मोहित भावे ,विशाल भोई , गणेश पाटील, योगेश बडगुजर, अजय भोई , विकी भावसार, राज घोगरे, सागर चौधरी , महेंद्र पाटील, चोपडा तालुका तापी सहकारी सूत गिरणी संचालिका सौ रंजना नेवे, सौ वंदना पाटील, सौ माधुरी अहिरराव, सौ रंजना मराठे आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते ही हजर होते .
यावेळी सर्वानी फिजिकल डिस्टन्स चे पालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More