जुन्नर तालुक्यातील अक्षय बोराडे या युवकास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्त मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान जळगाव तर्फे तहसीलदारांना निवेदन

आज मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान जळगाव जिल्हा मार्फत तहसीलदारांना निवेदन
जुन्नर तालुक्यातील अक्षय बोराडे या युवकास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्त निवदन देण्यात आले.आजच्या घडीला
लोक स्वताचे आईबाप सांभाळल नाहीत. शेकडो मायबापांचे संगोपन करनारा अक्षय बोराडे कित्येक पोरं ज्या वयात गाडीवर फिरणे बापाच्या पैशांवर मौजमजा करने त्या वयात हा युवक अनाथांचा_मायबाप झालाय,आज शेकडो अनाथांचे संगोपन करण्यात स्वताचे आयुष्य त्याने वाहून घेतलंय..
छत्रपती शिवरायांच्या जन्मभुमीत त्यांचा आदर्श घेऊन अनाथांचा नाथ झालाय अन त्याला बंगल्यावर बोलवून सत्यशील शेरकर यांनी मारहाण केली.
जर सहकार्य करता येत नसेल ना तर करू नका…पण चांगल्या कार्यात आडवा पाय घालू नका. म्हणून सदरील युवकावर जो अन्याय झाला आहे. त्या घटनेचा आम्ही आमच्या मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मार्फत जाहीर निषेध करतो.
आणी आपणांस विनंती करतो की लवकरात लवकर त्या युवकास न्याय मिळवून द्यावा. अन्यथा मराठा शिवमुद्रा मार्फत लॉकडाउन संपल्यावर पुर्ण महाराष्ट्रात अंदोलन छेडन्यात येइल. जर सदरील व्यक्ती आपले आरोप मान्य करायला तयार नसेल तर त्यांच्या बंगल्या वरील Cctv असेल तर त्यादिवसाचे. फुटेज प्रसारित करण्यात यावे आणी फुटेज आले नाहित कॅमेरे बंद होते वैगरे असे कारणे देऊ नयेत ही नम्रविनंती.अन्यथा मराठा समाज व मराठा शिवमुद्रा कायदा हातात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा आशयाचा मजकूर देण्यात आला. त्या प्रसंगी जळगाव प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील,डॉ सतिश भदाने, विकास निकम, स्वप्नील पाटील आदि पदाधिकारी उपस्थीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More