रोहित निकम यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ प्रदान#जळगाव जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण, भूमिपुत्राचा सातासमुद्रापार सन्मान…

जळगाव जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण, भूमिपुत्राचा सातासमुद्रापार सन्मान

लंडनमध्ये रोहित निकम यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ प्रदान

लंडनमध्ये भूमिपुत्र रोहित निकम यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ प्रदान

लंडनच्या ऐतिहासिक भूमीत सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन (LGEC)’ भव्य उत्साहात संपन्न झाले. या ऐतिहासिक अधिवेशनात आपल्या कर्तृत्वाने वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान दिलेल्या मान्यवरांना जागतिक स्तरावर गौरविण्यात आले. यामध्ये जळगाव जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि जिल्ह्याचे सहकार क्षेत्राचे संस्थापक सहकार महर्षी माजी आमदार बॅरिस्टर देवराम निकम यांचे नातू रोहित दिलीपराव निकम यांना ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामाबद्दल रोहित निकम यांचा सातासमुद्रापार सन्मान हा पुरस्कार सोहळा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकमत समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात सौ. अमृता जी देवेंद्र फडणवीस ,अभिनेते सुनिल शेट्टी , उद्योजक सज्जन जिंदाल , वेदांता ग्रुप चे अनिल अग्रवाल , लोकमत समूहाचे राजेंद्र जी दर्डा , विजय दर्डा, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ना. संजय जी शिरसाठ , सुधीर भाऊ मुनगन्टीवार ,राधाकृष्ण विखे पाटील , ना . सौ.पंकजाताई मुंडे ,चाळीसगावचे आमदार श्री. मंगेश चव्हाण ,आमदार सौ. श्वेताताई महाले यांसह विविध क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते .

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ ज्युरी समितीने रोहित निकम यांच्या आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, शेतकरी हितासाठी केलेले प्रयत्न आणि समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत एकमताने त्यांची निवड केली.

पुरस्कार स्वीकारताना रोहित निकम म्हणाले,“हा सन्मान माझ्या वैयक्तिक कामगिरीचा नाही, तर जनतेच्या विश्वासाचा आणि सहकाऱ्यांच्या सहकार्याचा परिणाम आहे. महाराष्ट्राचे नाव जागतिक पटलावर झळकविण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी खरा अभिमान आहे.” निश्चितच या सन्मानाने मी पुन्हा शेतकऱ्यासाठी आणखी चांगलं काम करेल.

रोहित निकम यांचा कार्याचा थोडक्यात आढावा…
रोहित निकम हे सध्या जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघात राज्य उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात संचालक, भाजप चे जळगाव पश्चिम चे जिल्हा उपाध्यक्ष या जबाबदाऱ्या सांभाळत असून, शेतकरी व सहकार क्षेत्रासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. प्रगतिशील विचारसरणी, सामाजिक दायित्व आणि भाजपाच्या विकासाभिमुख मार्गावर चालत अल्पावधीतच सहकार, शिक्षण, शेती व समाजकारण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे युवा नेतृत्व रोहित निकम यांना महाराष्ट्र भूषण या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

चोपडा तालुक्यातील मंगरुळ गावचे सुपुत्र असलेले रोहितदादा निकम यांचे कुटुंब शिक्षण, समाजसेवा आणि सहकार या क्षेत्राशी घट्टपणे जोडलेले आहे. त्यांचे आजोबा माजी आमदार स्वर्गीय बॅरिस्टर देवराम निकम यांनी ग्रामीण भागात आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली होती. मातोश्री शैलजादेवी निकम जिल्हा बँकेच्या संचालिका राहिल्या आहेत, तर वडील स्व. दिलीप निकम यांनी प्रगतशील शेतकरी आणि सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्याचबरोबर काका पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांची नुकतीच राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे.

रोहितदादा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपले प्रेरणास्थान मानून शेतकरी सेवक व समाजसेवक म्हणून कार्याची वाट धरली. अल्पावधीतच त्यांनी सहकार आणि कृषी क्षेत्रात नवे आयाम गाठले आहेत.

सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य
महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ लि. चे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी ६० वर्षांच्या इतिहासात विक्रमी ५,००० कोटींचा उलाढाल साध्य करत राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत सहकार क्षेत्रात एक वेगळे उदाहरण निर्माण केले आहे.

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाला नफ्यात आणत शेतकरी व दूध उत्पादकांना योग्य दर मिळवून दिला.
जळगाव जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला बंद पडण्याच्या स्थितीतून उभारी देत नवीन पिढीला रोजगार उपलब्ध करून देत सहकार क्षेत्रातील संस्था टिकल्या पाहिजे म्हणून सतत प्रयत्न केले.

शैक्षणिक क्षेत्रातील योगदान
‘सॉफ्टएड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण व आयटी क्षेत्राची ओळख करून दिली. ग्रामीण भागातील मुलांना प्रशासन व तंत्रज्ञानाशी निगडित प्रशिक्षण देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.

कृषी व सामाजिक कार्य
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शासन व स्थानिक स्तरावर योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न.
पणन महासंघामार्फत शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळवून देण्याचे कार्य.
“निकम अँड लाठी असोसिएट्स” या संस्थेद्वारे मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना स्वतःचे घर मिळावे यासाठी प्रयत्न.

राजकीय कार्य व सन्मान
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधकामासाठी जळगाव जिल्ह्यातून मोठा निधी उभारला. आज कृषी, सहकार, शिक्षण व क्रीडा क्षेत्रात बहुमोल योगदान देत पक्ष संघटना मजबूत करणाऱ्या या युवा नेतृत्वाला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More