मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूलच्या अडचणीत वाढ अमळनेर सत्र न्यायालयाचे आदेशाला औरंगाबाद हायकोर्टाकडून स्थगिती
मुस्तफा एज्युकेशन सोसायटीचे स्वयंघोषित अध्यक्ष असगर अली मेहबूब यांनी आमच्यावर केलेले आरोप सिद्ध करावे संस्थापक अध्यक्ष चिरागोद्दीन इजाबोद्दीन शेख
चोपडा येथील मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संचलित मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे बेकायदेशीर,अवैध व अनधिकृत कार्यकारणी कडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली गेली होती या विरोधात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिरागुद्दिन इजाबुद्दीन शेख यांनी चोपडा न्यायालयात खटला दाखल केला होता. त्या अनुषंगाने मे.कोर्टाने दि.26/09/2024 रोजी स्वघोषित अध्यक्ष अजगर अली महबूब अली सहित 15 लोकांविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशा विरोधात स्वघोषित अध्यक्ष अजगर अली महबूब अली यांनी अंमळनेर येथे सत्र न्यायालयात अपील दाखल केली होती म्हणून मे.सत्र न्यायालयाने चोपडा कोर्टाचे आदेशाला दि.18/08/2025 रोजी स्थगिती दिली होती.

म्हणून सदर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिरागोदिन इजाबुद्दीन शेख यांनी अमळनेर सत्र न्यायालयाच्या आदेशाला मा.औरंगाबाद खंडपीठ येथेआव्हान केले होते आणि मा. औरंगाबाद खंडपीठाने अंमळनेर सत्र न्यायालयाचे आदेशाला दि.04/09/2025 रोजी स्थगिती दिलेली आहे व मा. औरंगाबाद खंडपीठ यांनी सर्व 15 प्रतिवादी यांना पुढील तारखेला हजर राहण्याचे आदेश दिले आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिरागोदिन इजाबुद्दीन शेख व त्यांचे सोबत असगर अली रौनक अली आणि इस्माईल हाजी हसन तेली संस्थापक सदस्य यांनी दिली.
या संदर्भात ॲड.जितेंद्र पाटील, ॲड. कुशल जाधव, ॲड.अक्षय, ॲड. मोहनिश, जितेश थोरात, मोहम्मद कैफ, अक्षय आघाव यांनी काम पाहिले व सहकार्य केले.













