चोपडा येथे सहा कोरोना बाधित आढळले
चोपडा प्रतिनिधी चोपड्यातील अहवाल पैकी पैकी आज 30 अहवालांचे रिपोर्ट आले असता त्यात चोपडा येथील सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यात गणेश कॉलनी चार,पाटील गढी एक, पुंडलिक नगर भागातील एक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज पाटील यांनी दिली
जिल्ह्यात आणखी ५५ कोरोना बाधित रूग्ण आढळले
जिल्ह्याची एकूण कोरोना बाधित रुग्णाची संख्या झाली ६७६
जळगाव – आज अहवालामध्ये जिल्ह्यात तब्बल ५५ कोरोना बाधीत रूग्ण आढळले असून यामुळे एकूण रूग्ण संख्या ६७६ वर पोहचली आहे.
आज सायंकाळी आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात तब्बल ५५ कोरोना बाधीत रूग्ण आढळले असून यामुळे एकूण रूग्ण संख्या ६७६ वर पोहचली आहे. यात भुसावळ येथील १४, भडगाव ५, जळगाव ग्रामीण २, चोपडा ६ एरंडोल ३, अमळनेर ११, यावल ४, रावेर ८ आणि जामनेर एक अशा रूग्णांचा समावेश आहे.












