रा.स्व.संघच समाजात चांगल निर्माण करेल हा विश्वास – प्रशांत देवरे

रा.स्व.संघच समाजात चांगल निर्माण करेल हा विश्वास – प्रशांत देवरे

चोपडा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सर्व राष्ट्रवादी समाजाला संघरिप करायचे आहे.समाज परिवर्तनाचा संकल्प घेवून निघाला आहे.समाजाला जे काही चांगल करेल ते संघच करेल असा विश्वास असा विश्वास आहे.हिंदुराष्ट्र निर्माण करण्याचे कार्य सुरु झाले आहे,परंतु घाईगर्दी न करता सर्वोत्तम टिकाऊ पायाभरणी करूनच ते निर्माण करायचे आहे.

त्यामुळे संघ स्वयंसेवकांनी सातत्याने दररोज अर्धा तास समाजासाठी झिजण्याचा संकल्प केला पाहिजे.संघ शताब्दी संगमामुळे विजयादशमी उत्सव दणक्यात होईल असे मला वाटते.मनात धरलेली गणवेशधारी स्वयंसेवक त्यावेळी संचलनात येतील असे प्रयत्न करा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत मंडळ सदस्य प्रशांत देवघर यांनी येथे केले.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे चोपडा तालुक्यातील स्वयंसेवकांचा ‘संगम’ कार्यक्रम विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित कार्यक्रमात बौध्दीकांत श्री.देवरे बोलत होते.
याप्रसंगी विशाल एकडी यांनी पद्य सादर केले.कार्यक्रमाचा उद्देश सौरभ नेवे यांनी व्यक्त केला.प्रास्ताविक संगम प्रमुख महेंद्र शेटी यांनी केले.तर परिचय जयेश भोई यांनी करुन दिला.यावेळी मंचावर विभाग संघचालक राजेश पाटील,जिल्हा संघचालक डॅा.मनोज साळूंखे,कार्यवाह ज्ञानेश्वर सैंदाणे उपस्थित होते.


या बौध्दीकापुर्वी प्रागंणात संघ शाखा मुख्य शिक्षक शुभम नेवे यांनी लावली.यावेळी उपस्थित सर्व स्वयंसेवकांचे वेगवेगळ्या वाहिन्या करुन विविध खेळ घेण्यात आले.संचलनाचा सराव घेण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील पदाधिका-यांसह स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More