जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे नाव अनधिकृत वृत्त आरोग्य विभागाने केले प्रसिद्ध.चोपडा तालुका भाजपा चा वतीनी निषेध

जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे नाव अनधिकृत वृत्त आरोग्य विभागाने केले प्रसिद्ध.चोपडा तालुका भाजपा चा वतीनी निषेध

गोपनीयतेचा भंग केल्याने गुन्हा दाखल करणार.

जळगाव जिल्ह्यातील माजी खासदार माजी आमदार असलेले तालुक्यातील जिल्ह्याचे पदाधिकारी हे आज कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे वृत्त जिल्हा आरोग्य विभागाने प्रसिद्ध करून रुग्णाचे राजकीय पक्षाचे व पदाचा उल्लेख ( प्रसिद्धी )अनधिकृत रित्या प्रसिद्ध केल्याने आणि गोपनीयतेचा भंग केल्याने तसेच राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांनी कोरोना रुग्णाचे नांव जाहीर किंवा प्रसिद्ध करू नका असे आदेश काढलेले असताना.तसेच भालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्या पदाधिकाऱ्यांचा स्वॅब घेतल्याचे सुद्धा प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसह रावेर विधानसभा व लोकसभा मतदारसंघात संतप्त भावना व्यक्त करण्यात येत असून एका जबाबदार लोकप्रतिनिधी चे पदाचा एकेरी उल्लेख केल्याने संपूर्ण शासकीय व आरोग्य यंत्रणे बाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोग्य विभागाकडून रुग्णास बदनामी करणे संदर्भातली माहिती अनधिकृतपणे व्हायरल झाल्याने आरोग्य विभागातील संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

तसेच चोपडा शहर भाजपा चा वतीने माजी प.स.सभापती आत्माराम म्हाळके,शहर अध्यक्ष गजेंद्र जायसवाल,तालुका अध्यक्ष पंकज पाटील तालुका उप अध्यक्ष देवा बापू पाटील, विधानसभा विस्तारक प्रदीप पाटील ,जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील,युवा मोर्चाचे तुषार पाठक,प्रकाश(पप्पू) पाटील, शहर सरचिटणीस मनोहर बडगुजर, तापी सुगरणीचे संचालिका सौ रंजना नेवे ओबीसी सेलचे शहराध्यक्ष सुरेश चौधरी, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष हेमंत जोहरी, प्रसिद्धीप्रमुख यशवंत जडे, कार्यालय मंत्री मोहित भावे यांनी घडलेल्या संभधीत प्रकारचा निषेध व्यक्त करत गोपनीयता भंग करणाऱ्यांवर गुन्हे दखल करण्यात यावे मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More