जळगाव- जिल्ह्यात आज नव्याने ३६ कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले जळगाव@९०७ ,चोपडा येथे आज पुन्हा कोरोना बाधित आढळले

जळगाव- जिल्ह्यात आज नव्याने ३६ कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले असुन रूग्ण संख्या ९०७ इतकी झाली आहे. तर जळगाव आणि भुसावळ या दोन्ही ठिकाणी २०० पेक्षा अधिक रूग्ण आढळुन आले असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.
आज नव्याने ३६ रूग्ण आढळुन आले असुन त्यात जळगाव शहर ७, भुसावळ ७, अमळनेर ४, भडगाव १, यावल १, एरंडोल २, जामनेर ३, जळगाव ग्रामीण १, रावेर ५, पारोळा ५ अशा रूग्णांचा समावेश आहे.
*जळगाव, भुसावळने पार केला २००चा आकडा*
जिल्ह्यात आत्तापर्यंत जळगाव शहरात २०६ आणि भुसावळमध्ये २०५ अशी रूग्ण संख्या झाली असुन अमळनेरात १४३, चोपडा ४९, पाचोरा २८, भडगाव ७९, धरणगाव १८, यावल ३१, एरंडोल १७, जामनेर १७, जळगाव ग्रामीण २८, रावेर ५२, पारोळा १९, चाळीसगाव ८, मुक्ताईनगर ७ आणि दुसर्‍या जिल्ह्यातील ३ रूग्ण आहेत.

तसेच आज चोपडा येथील नासिक व औरंगाबाद येथे उपचार घेत असलेले पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे त्यात सुभाष चौक येथील एकाच परिवारातील दोन जण तर पटवे अळी भागातील दोन, चोपडा येथील मेन रोड परिसरातील एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती विश्र्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे नगर परिषदेकडून पटवे अळी भातात फवारणी करण्यात आली आहे वरील आकडेवारी मधे आज चे रुग्ण समाविष्ट नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More